Pune : नृत्य आणि गायनाने पंधरावा ‘बसंत उत्सव’ संपन्न

एमपीसी न्यूज – बांगीया संस्कृती संसदच्या वतीने पंधरावा ‘बसंत उत्सव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी (दि. 16) रोजी साजरा करण्यात आला. प्रचंड उत्साहपूर्ण वातावरणात हा सांस्कृतिक कार्यक्रम एम्प्रेस बोटॅनिकल गार्डन येथे संपन्न झाला. वसंत ऋतूतील रम्य सकाळच्या छटांचे विविध पैलू नृत्याद्वारे उलगडण्यात आले. कार्यक्रमाचे हे पंधरावे वर्ष होते.

‘फागून दिनेर रबी’ या कार्यक्रमात पुण्यातील विविध भागातून शंभराहून अधिक कलाकार सहभागी झाले होते. विविध गट आणि सांस्कृतिक समुदाय यांचे एकत्रित सादरीकरणाने हा कार्यक्रम उत्तम उदाहरण होता. यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या रचनांमधील निवडक दहा गाणी नृत्याद्वारे सादर करण्यात आली. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध गायिका रवींद्र संगीत, बांग्लादेशी कलाकार आदिती मोहसिन यांचे सादरीकरण कार्यक्रमाचे विशेष आकर्षण होते.

कार्यक्रमाचे उदघाटन बांग्लादेशचे कलाकार सुरेश पिंगळे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी संगीतकार, गायक व अभिनेते पद्मश्री शेखर सेन, गायक शुर्जो भट्टाचार्य, गायिका सुप्रतिक दास, आदिती मोहोसीन, बांगीया संस्कृती संसद व बसंत उत्सव समितीच्या अध्यक्षा सुजाता पॉल, सांस्कृतिक प्रमुख मधुमिता घोष, बिरेस्वर मित्र, अरुण चट्टोपाध्याय, सुभासीस बागल, शिवाजी मुखर्जी, डॉ. पुलक गुहाथूरता, बांगीया संस्कृती संसद कार्यकारी समिती सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुण्यातील सामाजिक-सांस्कृतिक संस्था बांगिया संस्कृती संसद 2006 पासून हा कार्यक्रम आयोजित करत आहे. संस्थेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून बंगाली संस्कृती आणि साहित्याचा प्रसार केला जातो अशी माहिती बसंत उत्सव समितीच्या अध्यक्षा सुजाता पॉल यांनी यावेळी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.