Vasant More : कितीही तोडा-जोडा, महापौर मात्र मनसेचाच!

एमपीसी न्यूज : महापालिकांच्या प्रभाग रचनांचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. मोठ्या कष्टाने पुणे महानगरपालिकेत तीनचा प्रभाग करण्यात आला होता. परंतु, फडणवीस शिंदे सरकार येताच पुन्हा यामध्ये बदल करण्यात आला असून चारचा प्रभाग ठेवण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला आता विरोध होतोय. पुण्यातील मनसेचे माजी नगरसेवक यांनी याच निर्णयावरून सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. कितीही तोडा जोडा आम्ही लढायला तयार आहोत. आता महापौर मनसेचाच होईल असा विश्वासही वसंत मोरे (Vasant More) यांनी व्यक्त केला. 

वसंत मोरे म्हणाले, याआधी प्रभाग रचना करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला होता. हा खर्च आता वाया गेला आहे. राज्य सरकारने पुन्हा एकदा चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतल्याने पुन्हा नव्याने सर्व गोष्टी कराव्या लागणार आहेत. राज्य सरकार हा सर्व खर्च कशासाठी करत आहे? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. एवढे सगळे करत आहात, तर महापालिकेचा महापौरही जनतेतून निवडून आणण्याचा कायदा करा. मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी हे करावेच असे आव्हानही त्यांनी राज्य सरकारला दिले.

Vijay Shivtare : बंडखोरीनंतर विजय शिवतारेंचा पहिला विजय, ग्रामपंचायत निकालात बाजी मारली

प्रभाग रचनेवरून नागरिकांना काहीही देणे घेणे नाही. त्याहून केवळ राजकारण सुरू आहे. चारचा प्रभाग केल्यानंतर यश मिळेल असे भाजपच्या लोकांना वाटते. मात्र, तुमच्या नगरसेवकांनी शहरात काम केले असेल, तर चार काय किंवा तीन काय कुठल्याही प्रभाग केला, तरी तुम्हाला यश मिळेलच. त्यामुळे घाबरण्याचे कारण काय? असे सांगत त्यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला टोला (Vasant More) लगावला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.