Vasanta More : पुलाचा ठेकेदार किती भारी असेल, आमची सत्ता आली तर… वसंत मोरेंचं ट्विट चर्चेत

एमपीसी न्यूज : मुंबई बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकात असलेला पूल अखेर पाडण्यात आला. यासाठी मागील काही महिन्यांपासून तयारी सुरू होती. 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्री स्फोटकांच्या मदतीने आधी पूल खिळखिळा करण्यात आला आणि त्यानंतर जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या सहाय्याने हा फुल जमीनदोस्त करण्यात आला.

सुरुवातीला स्फोटक झाल्यानंतरही हा पूल पडला नसल्याने सोशल मीडियावर याची चांगलीच चर्चा झाली होती. ठेकेदारांना किती मजबूत काम केलं होतं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया लोकांमधून येत होत्या. त्यानंतर मनसेचे नेते वसंत मोरे यांनी देखील या संदर्भात एक ट्विट केला आहे. त्यांचं हे ट्विट आता चांगलं चर्चेत आहे.

Kamgar Sanghatana : फोटो काढला म्हणून पुण्यात कामगार संघटनेच्या अध्यक्षाला मारहाण

वसंत मोरे (Vasanta More) यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 600 किलो स्फोटक, 1350 होल, पूल पाडण्यासाठी ट्विन टॉवर पाडलेली कंपनी, गेल्या महिन्यापासून धावपळ, केंद्रीय मंत्री, खासदार, प्रदेश अध्यक्ष, पालकमंत्री, आमदार, नगरसेवक, कार्यकर्ते यांची रेलचेल, प्रचंड मोठी यंत्रणा, तरीही पूल पूर्ण पाडू शकले नाहीत. यावरुन एक मात्र फिक्स की पुलाचा ठेकेदार किती भारी असेल!

भविष्यात जर मनसेच्या हाती पुण्याची सत्ता आली तर पुलाची सर्व कामे याच ठेकेदाराला द्यावी व रस्त्यांची सर्व कामे जंगली महाराज रोडच्या ठेकेदाराला द्यावीत अशी शिफारस मी तरी नक्की करेन.. वसंत मोरे यांनी केलेल्या ट्विटची सध्या सोशल मीडियात चांगलीच चर्चा आहे.
चांदणी चौकातील पूल 1 ऑक्टोबरच्या मध्यरात्री पाडण्यात (Vasanta More) आला. मात्र हा पूल पाडण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. ज्या कंपनीकडे हा पूल पाडण्याचं काम होतं, त्यांनी यानंतर स्पष्टीकरण देताना सांगितले, की आमचा अंदाज होता त्यापेक्षा जास्त स्टील या पूलाच्या बांधकामावेळी वापरण्यात आलं होतं. हे स्टील दोन्ही बाजूंनी असलेल्या दगडांमध्ये फिक्स करण्यात आलं असल्याने स्फोट झाल्यानंतरही पूलाचे स्ट्रक्चर खाली आलं नाही. असं या पुलाच्या पाडकामाचे नियोजन करणारे मुख्य अभियंते आनंद शर्मा यांनी सांगितले.
https://youtu.be/NfPJSr_DJ2E

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.