Pimpri : पारंपारिक पध्दतीने वसुबारस साजरी

एमपीसी न्यूज – आश्विन वद्य द्वादशी अर्था‌त वसुबारस म्हणजे दिवाळीची सुरुवात. त्यामुळे शहरात सर्वत्र दरवर्षी दिवाळीचा पहिला दिवस गाय वासराच्या पूजनाने साजरा केला जातो. रविवारी या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही संबोधले जाते. भारतीय संस्कृतीमध्ये गायीला असलेले महत्त्व लक्षात घेऊन हा दिवस पारंपरिक पध्दतीने साजरा केला गेला.

पिंपरीतील श्री संत तुकाराम प्रतिष्ठानच्यावतीने गायीचे पूजन करण्यात आले तर, काही ठिकाणी संध्याकाळी गाय वासरांची पूजा करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणच्या गोठ्यांमध्ये या पूजनाचे आयोजन करण्यात आले यावेळी सुवासिनींनी गाईला हळद कुंकू लावून औक्षण केले. त्याचप्रमाणे अनेकांनी गुळ, दाळ, पुरण पोळी, उडदाचे वडे गाईंना खाऊ घातले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III