Pimpri-chinchwad RTO News : पुणे-मुंबई महामार्गावर वायुवेग पथकाकडून वाहनांची तपासणी

एमपीसी न्यूज – पिपंरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) वायुवेग पथकाकडून पुणे-मुंबई महामार्गावर वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. कागदपत्रे नसणे, अपूर्ण असणे तसेच वाहतुकीचे नियम न पाळणे याबाबत संभाव्य कारवाई टाळण्यासाठी वाहनधारकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड आरटीओ कडून करण्यात आले आहे.

वाहनधारकांनी मोटार वाहन कर, वाहनाचा पर्यावरण कर विहीत मुदतीत भरणे तसेच वाहनाचे विधिग्राह्य विमा प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र यासह वाहनाच्या संबंधित इतर सर्व कागदपत्रे मुदतीत असल्याबाबत वाहनधारकांनी खात्री करावी.

पुणे-मुंबई महामार्गावर वायुवेग पथकाकडून लेन कटींग, सीट बेल्ट न घालणे, वेग मयादेचे उल्लंघन करणे, अवैध पार्किंग इत्यादी गुन्ह्याची तपासणी केली जात आहे. वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वाहन कर व दंड भरून सोडवून न घेतल्यास अशा वाहनांचा लिलाव करण्याची कार्यवाही देखील करण्यात येत असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.