Bhosari News : दुर्दैवी! 16 कोटींच्या इंजेक्शननंतरही वेदिका शिंदेची मृत्यूशी झुंज अपयशी

एमपीसी न्यूज : पिंपरी- चिंचवडमधील चिमुकल्या वेदिका शिंदे जनुकीय आजाराने ग्रस्त होती. तिच्या उपचाराकरिता लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमवून इंजेक्शनची सोय करण्यात आली. त्यासाठी तिच्या पालकांनी जीवाचे रान केले होते, मात्र  वेदिकाचा अखेर मृत्यू झाला.  

1 ऑगस्ट रोजी सायंकाळी वेदिका खेळत असताना तिला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास झाला. रुग्णालयात दाखल केले असता तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

वेदिकावर उपचार व्हावेत आणि तिला महागडे 16 कोटीचं इंजेक्शन मिळावं यासाठी तिच्या आई-वडिलांनी खूप धडपड केली होती. तिच्या इंजेक्शनसाठी लोकवर्गणीतून 16 कोटी रुपये जमाही करण्यात आले होते. तसेच पुण्याच्या खासगी रुग्णालयात जून महिन्यात वेदिकाल झोलगेन्स्मा  ही लस देण्यात आली होती. मात्र, एवढे सारे प्रयत्न करुनही वेदिकाचे प्राण वाचू शकले नाहीत.

वेदिका SMA या आजाराने होती त्रस्त, काय आहे तो आजार?

जेनेटिक स्पायनल मॅस्कुलर अ‍ॅट्रोफी म्हणजेच SMA हा आजार शरीरात एसएमएन-1 जीनच्या कमतरतेमुळे होतो. यामुळे छातीचे स्नायू कमकुवत होतात आणि श्वास घेण्यात अडथळा येतो. हा आजार जास्तकरुन लहान मुलांना होतो आणि त्रास वाढून रुग्णाचा मृत्यू होतो. ब्रिटनमध्ये हा आजार मोठ्या प्रमाणात आहे आणि तिथे दरवर्षी जवळपास 60 बाळांना जन्मजात हा आजार होतो.

या आजाराचं इंजेक्शनची किंमत एवढी ?

ब्रिटनमध्ये अनेक बाळांना या आजाराने ग्रासलं आहे. पण, तिथे याचं औषध तयार होत नाही. या इंजेक्शनचं नाव जोलगेनेस्मा आहे. ब्रिटमध्ये हे इंजेक्शन अमेरिका, जर्मनी आणि जापानहून मागवलं जातं. हा आजार असलेल्या रुग्णाला एकदाच हे इंजेक्शन दिलं जातं. हे इंजेक्शन इतकं महाग आहे, कारण जोलगेनेस्मा त्या तीन जीन थेरेपीपैंकी एक आहे ज्या थेरेपीला युरोपात प्रयोग करण्याची परवानगी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.