Veer Dam Update : वीर धरणातून नीरा नदीपत्रात एकूण 33 हजार 359 क्यूसेक विसर्ग सुरु

एमपीसी न्यूज : वीर धरणाच्या उजवा कालवा (Veer Dam Update) विद्युतगृहातुन 900 क्यूसेक व डावा कालवा विद्युतगृहातून 300 क्यूसेक विसर्ग नदीपत्रात सुरू आहे. वीर धरणाच्या सांडव्यातून आज पहाटे 3 वाजता विसर्गात वाढ करून 32 हजार 459 क्यूसेक इतका करण्यात आला आहे.

नीरा नदीपत्रात एकूण 33 हजार 659 क्यूसेक विसर्ग सुरू आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी. नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी. नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन करण्यात आले.

Independence Day : इनोव्हेटीव्ह वर्ल्ड स्कूलमध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.