Vegetable : सफर रानभाज्यांची

एमपीसी न्यूज –   पावसाळा सूरू झाला की वेध लागतात ते रानभाज्याचे . जसा चातक पक्षी पावसाच्या (Vegetable)  पाण्याच्या थेंबाची आतूरतेने वाट पाहत असतो, त्याच प्रमाणे खेड्यातील लोकही या पावसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. कारण या हिरव्यागार निसर्गाच्या सानिध्यात लपलेल्या रानभाज्या या पावसाळ्यातच पाहायला मिळतात. लोप पावत चाललेल्या पण खेड्यातील लोकांनी जतन करून ठेवलेली खरी संपत्ती म्हणजे म्हणजे पावसाळी रानभाज्या. रानभाज्या म्हणजे निसर्गाने दिलेली एखादी अनमोल भेट आहे असे खेड्यातील लोक सांगतात.

पावसाळ्यातील चारही महिने खेड्यातील लोकांच्या आहारामध्ये या रानभाज्यांचा समावेश खूप जास्त प्रमाणात असतो. रानभाज्या खाल्ल्याने आम्हाला काम करण्यास ताकद मिळते असे त्यांचे म्हणणे आहे. आजवर या भाज्यांची नावे फक्त ऐकली होती .पण वर्क फॉर इक्वॅलिटी या संस्थेच्य माध्यमातून अंदर मावळ परिसरातील सर्वात शेवटचे गाव सावळा “आहारातून आरोग्य” हा प्रकल्प सुरू करण्यात आला.

कारण या गावातील लोकांना आणि खास करून महिलाना भाजी आणण्यासाठी तिथून 35 ते 40 किलोमीटर लांब टाकवे या गावी यावे लागते. त्यामुळे या गावातील लोकांना तसे पाहिले तर फक्त पावसाळ्यातच येणाऱ्या रानभाज्या खाऊन त्यांचा वर्षभरासाठी ताकद घ्यावी लागते.

Maval : श्रीमती तान्हुबाई दाभाडे यांचे निधन

अशा प्रकारे या रान भाज्यांचे या गावकऱ्यांच्या आणि महिलांच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्व जरी असले तरी हा अनमोल ठेवा कुठेही लिखित नसल्यामुळे त्याचा प्रचार आणि प्रसार पाहिजे तेवढा होत नाही आणि नवीन पिढीतील महिलांना याची माहिती आणि महत्व नसल्यामुळे हळुहळू ही संपदा लोप पावत चालली आहे.

त्यामुळे लोप पावत चाललेल्या पण  दुर्मिळ अशा या रानभाज्यांच्या संस्कृतीचा वारसा स्थानिक महिलांच्या मदतीने लिखित स्वरूपात सर्वांसाठी उपलब्ध करण्याचे ठरविले आणि सफर रान भाज्यांची सुरू झाली.

चायत

पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगराळ भागात येणारी ही चायताची भाजी खूप जास्त प्रमाणात जंगलात दिसून येते ही एक वेलवर्गीय भाजी आहे. याचा (Vegetable) कोवळा देठ भाजीसाठी वापरला जातो. पण ही भाजी एकाच ठिकाणी न सापडता थोड्या थोड्या अंतरावर वेगवेगळ्या झाडा झुडपांवरती तिचा वेल दिसून येतो . शरीरासाठी खूप उपयुक्त असणारी अशी हिरवट मातेरी रंगाची चयताची भाजी मे ते जुलै (वैशाख-आषाढ) या महिन्यामध्ये जंगलात पहावयास मिळते.

उपयोग– शरीरातील अशक्तपणा कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग होतो.

लोत

पावसाच्या सुरुवातीला तीन टप्प्यांमध्ये मिळणारी ही भाजी तीन वेगवेगळ्या प्रकारांमध्ये आपल्याला रानात पहावयास मिळते . पहिला प्रकार म्हणजे शेवाळे दुसरा प्रकार म्हणजे लोतीची पाने आणि तिसरा प्रकार म्हणजे सुंदर असे फुल अशी ही लोतीची भाजी. लोतीच्या भाजीचा देठ हा सापाच्या त्वचेप्रमाणे असतो. तसेच पानेही हिरवीगार असतात. त्याचे फुल पिवळसर रंगाचे असते व त्याचा आकार नागासारखा असतो.

उपयोग– पोटाच्या आरोग्यासाठी या भाजीचा उपयोग.

भारंगी

पावसाच्या सुरुवातीलाच म्हणजेच मे ते ऑगस्ट या दरम्यान मिळणारी ही भारंगीची भाजी शरीरासाठी खूप उपयुक्त अशी भाजी. या भाजीची हिरवीगार  (Vegetable) पाने व कडा कातरलेल्या असतात. या पानांची भाजी करतात. तसेच निळसर पांढऱ्या
रंगाची फुले या झाडाला येतात .या फुलांचीही भाजी करतात .रानामध्ये थोड्या अंतरावरती या भारंगीची रोपे दिसून येतात.

उपयोग- 
1.ताप कफ कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग केला जातो.
2.पोटात कृमी किंवा जंत झाल्यास पाणी शिजवून त्यातील पाणी गाळून पिल्यास आराम मिळतो.

पाथरीची भाजी


पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही दिवसानंतर लगेच जमिनीलगत उगवणारी अशी पाथरीची भाजी हिरवीगार,  टवटवीत ,कोवळी ,कातरलेली पाने अशी  असते. ही पाथरीची भाजी जून ते सप्टेंबर या दरम्यान रानात दिसून येते.

उपयोग- 1.पित्ताचा त्रास कमी करण्यासाठी या भाजीचा उपयोग करतात.
2.या भाजीच्या सेवनाने बाळंतीण स्त्रियांमध्ये दूध वाढण्यास मदत होते .

आळंबी

पावसाळा सुरू झाला की काही ठराविक ठिकाणी रानामध्ये आळंबी दिसून येतात. शहरी भाषेत याला मशरूम असेही  म्हणतात. पावसाळ्यात 15 ते 20 दिवसांच्या कालावधीत आळंबी रानात दिसून येतात. जंगली मशरूम हे शेतातील मशरूमापेक्षा जास्त चवदार असतात .

उपयोग
1.त्वचेच्या विकारांमध्ये अळिंबाचा खूप मोठा फायदा होतो.
2.अळिंब खाल्ल्याने स्तनांचा कर्करोग होण्याच्या धोका कमी होतो.

रानऔषधी वनस्पती 
जसा पावसाळा चालू झाला की रानभाज्या रानामध्ये डोकावू लागतात. तसेच गवताच्या आड लपलेल्या काही औषधी वनस्पतीही (Vegetable)  रानामध्ये पाहायला मिळतात. वेगवेगळ्या आजारावरती घरगुती उपाय म्हणून या रान औषधांचा उपयोग केला जातो. अशाच काही गवताआड लपलेल्या या राना औषधी वनस्पती.

कावळी

उपयोग-पोट दुखी असल्यास या झाडाची पाने चावून खातात त्यामुळे पोटाला आराम मिळतो.

फांगुळ

उपयोग:
1. लहान मुलांना पोटाच्या आजार होऊ नये म्हणून पांगळ वनस्पतींच्या कोवळ्या पानांचा रस मुलांना पाजतात.
2.ताप आल्यास या पानाचा रस अंगाला चोळतात .

म्हातारा

उपयोग :
1 .पावसाळ्यामध्ये पायाला चिखल्या झाल्यास या वनस्पतीच्या पानांचा लेप पायाला लावतात.

कराट कांगोनी

उपयोग-
1 .कराट कांगुनी या वनस्पतीची फळे वाळवून घरगुती पद्धतीने त्याचे तेल काढले जाते .अंगदुखी व संधिवात यासाठी या तेलाचा उपयोग केला जातो.

रानफळे व कंद 
रानामध्ये वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कंद पाहायला मिळतात. तसेच काही रानफळे पाहायला मिळतात . यालाच आपण रानमेवा असेही म्हणतो . जंगलामध्ये अनेक प्राणी आपल्या उपजीविकेसाठी या फळांचा व कंदांचा उपयोग करतात. खेड्यातील लोकही खूप आवडीने या रानफळांचा व कंदांचा आस्वाद घेतात . खूप दुर्मिळ असे हे कंद वर्षातून एकदाच रानामध्ये पहायला मिळतात . पावसाळ्यामध्ये मिळणाऱ्या कंदांचा केलेला अभ्यास.

रानफळ गोमटे

रानामध्ये थोड्या थोड्या अंतरावर वेगवेगळ्या झाडाझुडपांवरती गोमटेचा वेल दिसून येतो. तोंडली सारखे दिसणारे हे फळ चवीला काकडी सारखे असते .

हळूंदा


पावसाळ्यात मिळणारा वेलवर्गीय असा हा कंद झाडाझुडपांमध्ये याचा वेल दिसून येतो. जमिनीच्या आतमध्ये याचा कंद असतो. उपवासासाठी फराळ म्हणून या कंदाचा उपयोग केला जातो.

रानभाज्यांची माहिती संग्रही करण्याचा प्रयत्न करत हा  नैसर्गिक वारसा जतन करण्याचा उपक्रम प्राज इंडस्ट्रीज प्रा.लिमिटेड आणि work for Equality यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू आहे.

लेखिका – वंदना धिंडळे
                सामाजिक कार्यकर्ती
                वर्क फॉर इक्वॅलिटी सामाजिक संस्था
                [email protected]
                तळेगाव दाभाडे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.