Pune News : भाजी विक्रेत्यांना 20 जणांच्या टोळक्या कडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : जोरात ओरडून विक्रेते भाजी विकत असल्यामुळे याचा त्रास होत असल्यामुळे 20 जणांच्या टोळक्याने तीन भाजी विक्रीत्यांना बेदम मारहाण केली रविवार पेठेतील मदिना मज्जित समोर मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला. फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अनिरुद्ध समाधान ईनामदार (वय 20) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार बशीर शेख, वाजिद बशीर शेख, साकिब अनुरे, शब्बीर इक्बाल टिनवाला, निशांत शिकलकर, जुल्फी शेख, तबरेज इब्राहीम, अलाउद्दीन इमामुद्दिन शेख यांच्यासह अठरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि त्यांचे मित्र रविवार पेठेत जोरात सोडून भाजी विक्री करीत होते. त्यांच्या आवाजाच्या कारणावरून सर्व आरोपींनी संगणमत करून तिघांना लोखंडी साखळी स्टीलचे ताट आणि हाताने बेदम मारहाण. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.