Vehicle Theft : मोशी आणि थेरगावमधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – शहरात वाहनचोर सुसाट सुटले आहेत. त्यांना आवरण्यात पोलिसांना अपयश येत आहे. थेरगाव आणि मोशी परिसरातून आणखी दोन दुचाकी चोरीला गेल्याची नोंद मंगळवारी (दि. 14) वाकड आणि एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात झाली आहे.

दुचाकी चोरीच्या पहिल्या गुन्ह्यात गणेश गुलकांत बिरादार (वय 19, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी त्यांची 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी 30 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास जय गणेश साम्राज्य चौक, मोशी येथे पार्क केली होती. सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ते परत आले असता त्यांना दुचाकी चोरीस गेल्याचे दिसून आले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

दुचाकी चोरीच्या दुसऱ्या गुन्ह्यात अशोक श्रीराम जरे (वय 32, रा. आनंदवन सोसायटी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी जरे यांनी आपली 15 हजार रुपये किंमतीची (एमएच 23 यू 6344) ही दुचाकी मंगळवारी (दि. 14) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यान येथे पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने अवघ्या 50 मिनिटांमध्ये ही दुचाकी चोरून नेली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.