22.2 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Vehicle Theft : पिंपरी-चिंचवड शहरातून आणखी पाच दुचाकी लंपास

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. शहरातील विविध भागातून पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 22) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

वाहन चोरीची पहिली घटना चाकण परिसरात उघडकीस आली. मंगळवारी (दि. 20) दुपारी तीन ते रात्री दहा वाजताच्या सुमारास महाळुंगे येथे सुजलाॅन कंपनी समोरील पार्किंगमधून तीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एफ झेड 3162) चोरीला गेली.

याबाबत सत्यवान अर्जून गोल्हे (वय 24, रा. वाळुंज, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाहन चोरीची दुसरी घटना बनकर वस्ती, मोशी येथे घडली. सात जुलै रोजी रात्री साडेअकरा ते आठ जुलै रोजी सकाळी सात वाजताच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी बनकर वस्तीमधून वीस हजारांची दुचाकी (एम एच 14 / डी वाय 6261) चोरून नेली.

याबाबत परमेश्वर अंबादास गवळी (वय 40, रा. बनकर वस्ती, मोशी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कृष्णानगर पोलीस लाईन, चिखली येथून एका वाहनाचा (एम एच 14 / एच डी 1905) सायलेन्सर चोरीला गेला आहे. सुरेश रामकिशन पवार यांनी याबाबत चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

20 जुलै रोजी रात्री साडेनऊ ते 21 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या कालावधीत फिर्यादी पवार यांच्या गाडीचा वीस हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरट्यांनी चोरून नेला.

आनंदनगर, जुनी सांगवी येथून एका घरासमोरून पाच हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / बी ई 2011) चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना 21 जुलै रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्रशांत विश्वनाथ विभुते (वय 48) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

भुंडे वस्ती, बावधन येथून चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 12 / क्यू एच 4774) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 22) सकाळी उघडकीस आली आहे.

याबाबत गणेश पांडू जाधव (वय 26) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

रावेतमधील एका सोसायटीच्या पार्किंगमधून चोरट्यांनी पंचवीस हजारांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार बुधवारी (दि. 21) सायंकाळी उघडकीस आला. याबाबत स्वप्नील संजय जाधव (वय 31 रा. रावेत) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

spot_img
Latest news
Related news