Vehicle Theft : चाकण, वाकड, सांगवी, देहूरोड मधून चार दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून चार दुचाकी वाहने चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 18) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मेदनकरवाडी मधून अज्ञात चोरट्यांनी घरासमोर पार्क केलेली 20 हजारांची दुचाकी चोरून नेली आहे. तर कस्पटे वस्ती, वाकड मधून बुधवारी दिवसभराच्या कालावधीत जिओ स्क्वेअरच्या समोरून 15 हजारांची दुचाकी चोरीला गेली आहे.

सांगवी मधील श्रीकृष्ण नगर पिंपळे गुरव येथून आठ हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही दुचाकी रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. तर रावेत येथील डी वाय पाटील कॉलेजच्या बाहेरील बाजूला पार्क केलेली 40 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी भर दिवसा चोरून नेली. याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.