Vehicle Theft News : पिंपरी, निगडी, वाकडमधून चार दुचाकी चोरल्या

एमपीसी न्यूज – शहराच्या पिंपरी, निगडी आणि वाकड परिसरातून चार दुचाकी चोरीला गेल्याचे प्रकार बुधवारी (दि. 13) उघडकीस आले. त्याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किशोर अनिल चंदनशिवे (वय 30, रा. रमाबाई नगर, पिंपरी) यांची 50 हजार रुपयांची दुचाकी (एम एच 14 / जे बी 7163) अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या पार्किंगमधून चोरून नेली. चंदनशिवे यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मोरेश्वर रामचंद्र काळभोर (वय 40, रा. रावेत) यांची 10 हजारांची दुचाकी (एम एच 14 / ए 8019) अज्ञात चोरट्यांनी निगडी प्राधिकरण येथील महावीर रेसिडेन्सीमधून चोरून नेली. याबाबत काळभोर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यातील एका गुन्ह्यात सुनील हरी पवार (वय 53, रा. श्रीनगर, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. पवार यांची 35 हजारांची मोपेड दुचाकी (एम एच 14 / बी एच 3556) अज्ञात चोरट्यांनी विजयनगर काळेवाडी येथील गणेश कॉलनी मधून चोरून नेली.

तर दुस-या गुन्ह्यात सिद्धार्थ दशरथ गायकवाड (वय 36, रा. सुयोग कॉलनी, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. गायकवाड यांची 75 हजारांची दुचाकी (एम एच 14 / जे सी 3479) अज्ञात चोरट्यांनी थेरगावातील गुजर चाळ, जगताप नगर येथून चोरून नेली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.