Vehicle Theft : चाकण, वाकड, निगडी मधून तीन दुचाकी तर चिखली मधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण, वाकड आणि निगडी परिसरातून प्रत्येकी एक दुचाकी चोरीला गेली. तर चिखली परिसरातून चोरट्यांनी एक रिक्षा चोरून नेली आहे. तसेच सांगवी परिसरातून एका गाडीचा सायलेन्सर देखील चोरट्यांनी चोरून नेला आहे. याबाबत शनिवारी (दि. 7) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चाकण परिसरातून पंचवीस हजार रुपये किमतीची एक दुचाकी (एम एच 14 / एच जे 1297) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास झित्राईमळा, चाकण येथे उघडकीस आला. राजू मलाराम गेहलोत यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

विजयनगर, काळेवाडी येथील गोल्डन हॉटेल समोर पार्क केलेली तीस हजारांची पल्सर दुचाकी (एम एच 14 / डी जी 3398) अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार 23 जुलै रोजी उघडकीस आला. याबाबत विवेक सुखलाल यादव (वय 32, रा. पाचपिर चौक, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

आकुर्डी येथील रेम्बो उद्यानासमोर उभी केलेली 20 हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एफ यू 5562) अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना आकुर्डी येथे शनिवारी (दि. 7) सायंकाळी घडली. याबाबत अनुराग किशोर पवार (वय 19, रा. राजयोग बंगला, प्राधिकरण, निगडी) यांनी शनिवारी (दि. 7) याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

पाटीलनगर, चिखली येथून चाळीस हजारांची एक रिक्षा (एम एच 14 / जी सी 5683) चोरट्यांनी चोरून नेली. संतोष शाबास कोळेकर (वय 43, रा. केशवनगर, नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. कोळेकर यांनी चार ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास पाटीलनगर मधील सचिन कारके यांच्या घरासमोर त्यांची रिक्षा पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी मोकळ्या जागेतून रिक्षा चोरून नेली. पाच ऑगस्ट रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

विशालनगर, पिंपळे निलख येथे एका ईको गाडीचा 40 हजार रुपये किमतीचा सायलेन्सर चोरट्यांनी चोरून नेला. अशोक बालाराम चौधरी (वय 45, रा. विशालनगर, पिंपळे निलख) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.