Vehicle Theft : चाकण आणि पिंपरी मधून दोन दुचाकी चोरीला

एमपीसी न्यूज – चाकण आणि पिंपरी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी वाहने चोरून नेली. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

प्रकाश बबन कोळेकर (वय 40, रा. धामणे, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कोळेकर यांनी त्यांची पंचवीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / ए के 9050) रविवारी सकाळी आठ वाजता चाकण बस स्टॉप उड्डाण पुलाच्या बाजूला असलेल्या पान टपरी समोर पार्क केली. दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे सकाळी अकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आले. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

महेश हनुमंत नलावडे (वय 45, रा. सूर्योदय कॉम्प्लेक्स, काळभोर नगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी नलावडे यांनी त्यांची 35 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एफ के 5533) 26 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 27 जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.