-MPC-TOP-MOST-BANNER-I

Vehicle Theft : चाकण परिसरातून दोन दुचाकी चोरीला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – चाकण परिसरातील नाणेकरवाडी आणि वासुली गाव येथून दोन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 21) चाकण पोलीस ठाण्यात अज्ञात यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात सचिन शिवाजी राजगुरू (वय 33, रा. नाणेकरवाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजगुरू यांनी त्यांची पंचवीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एच पी 7433) शनिवारी रात्री साडेआठ वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.

दुसऱ्या प्रकरणात महिंद्र बबन चोरघे (वय 41, रा. वासुली गाव, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची वीस हजार रुपये किमतीची दुचाकी (एम एच 14 / एफ के 8602) सोमवारी रात्री दीड वाजता त्यांच्या घरासमोर पार्क केली. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी पहाटे साडेसहा वाजता उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास चाकण पोलीस करीत आहेत.

 

.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1POST DOWn