_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Vehicle Theft : पिंपरी, सांगवीतून दोन रिक्षा तर निगडीतून दुचाकी चोरीला

0

एमपीसी न्यूज – पिंपरी आणि सांगवी परिसरातून दोन तीन चाकी रिक्षा चोरून नेण्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. तर निगडीतून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत बुधवारी (दि. 9) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

माधुरी किशोर जाधव (वय 22, रा. खंडोबा माळ, आकुर्डी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची 70 हजार रुपये किमतीची रिक्षा (एम एच 14 / एच एम 0718) त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 7) पहाटे साडेपाच वाजता उघडकीस आला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

सुनील अल्बर्ट साठे (वय 62, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात रिक्षा चोरीबाबत फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचे मित्र सलीम जलाल सय्यद यांच्या नावावर असलेली 70 हजार रुपये किमतीची रिक्षा (एम एच 12 / एस के 1839) फिर्यादी यांच्या घराजवळ रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती. अज्ञात चोरट्यांनी त्यांची रिक्षा चोरून नेली. हा प्रकार बुधवारी (दि. 9) मध्यरात्री दीड वाजता उघडकीस आला.

राहुल मोजिल बिश्वास (वय 19, रा. थॉमस कॉलनी, देहूरोड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 35 हजार रुपये किमतीची मोपेड दुचाकी (एम एच 14 / एफ झेड 6537) अज्ञात चोरट्यांनी पंचतारानगर, आकुर्डी येथील एका किराणा दुकान समोरून चोरून नेली. हा प्रकार सहा जून रोजी सकाळी उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Leave a comment