Vehicle Theft : निगडी आणि चिखलीत पार्किंगमधून दोन स्प्लेंडर दुचाकी लंपास

एमपीसी न्यूज – निगडी आणि चिखली परिसरातून दोन स्प्लेंडर दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 29) संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून शहरात स्प्लेंडर दुचाकी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

किशोर सुनील नेमाले (वय 26, रा. ओमसाई हाउसिंग सोसायटी, टॉवर लाईन, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची पंधरा हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्लस दुचाकी (एम एच 14 एचपी 2830) 27 एप्रिल रोजी त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती. रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 28 एप्रिल रोजी पहाटे उघडकीस आला.

चिखली पोलीस तपास करीत आहेत.

सागर नामदेव सपकाळ (वय 33, रा. यमुनानगर, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्याची पंधरा हजार रुपये किमतीची स्प्लेंडर प्रो दुचाकी (एम एच 14 / ई डी 5614) 28 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता घरासमोर पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली.

निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.