Vehicle Theft : पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरटे सुसाट; सात दुचाकी, एक ट्रक चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे. घराच्या समोर, सोसायटीच्या पार्किंगमध्ये, सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली वाहने चोरून चोरटे सुसाट जात आहेत. भोसरी, चाकण, पिंपरी, चिखली आणि तळेगाव दाभाडे परिसरात सात दुचाकी तर हिंजवडी मधून एक ट्रक चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत गुरुवारी (दि. 2) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मयूर दत्तात्रय निकम (वय 24, रा. आंबेठाण रोड, चाकण) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 9 ऑक्टोबर 2018 रोजी रात्री सात वाजता फिर्यादी यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची दुचाकी भोसरी उड्डाणपुलाखाली पार्क केली. अवघ्या अडीच तासात अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी तब्बल तीन वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

योगेश काशिनाथ वडर (वय 26, रा. भाम फाटा, ता. खेड) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची दुचाकी त्यांच्या घरासमोर पार्क केली होती. चोरट्यांनी घरासमोरून फिर्यादी यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार एक सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आला.

मकरंद श्रीधर मनगिरे (वय 22, रा. जाधववाडी, चिखली) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 70 हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्यांनी संतनगर मोशी येथून चोरून नेली. हा प्रकार 27 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते 28 ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या कालावधीत घडला.

मुकेश गंगाराम साळवे (वय 41, रा. पिंपरीगाव) आणि शुभम संजय पोहरे (वय 26, रा. रुपीनगर, निगडी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळवे यांची 15 हजारांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार एक सप्टेंबर रोजी सकाळी उघडकीस आला. तर पोहरे यांची एक लाख रुपये किमतीची दुचाकी साई रो हाऊस सोसायटी, मोरवाडी पिंपरी येथून चोरून नेली.

शैलेजा क्रांतिकुमार कडुलकर (वय 58, रा. चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 12 हजार रुपये किमतीची दुचाकी घरासमोरून चोरून नेली. हा प्रकार 14 ऑगस्ट रोजी पहाटे उघडकीस आला.

प्रमोद काकासाहेब मोरे (वय 33, रा. किवळे) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची 10 हजारांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पवना हॉस्पिटलच्या पार्किंग मधून चोरून नेली. पवना हॉस्पिटलच्या पार्किंग मधून वाहने चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

जीवन चंद्रकांत भूमकर (वय 36, रा. भूमकरनगर, वाकड) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांचा नऊ लाख रुपये किमतीचा हायवा ट्रक 28 ऑगस्ट रोजी रात्री सात वाजता भूमकर चौकातील एका सोसायटीच्या समोर पार्क केला. अज्ञात चोरट्यांनी त्यांचा हायवा ट्रक चोरून नेला. हा प्रकार 2 सप्टेंबर रोजी दुपारी उघडकीस आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.