Wakad News : म्हातोबानगरमध्ये वाहनांची तोडफोड

एमपीसी न्यूज – वाकड मधील म्हातोबानगर येथे एका टोळक्याने रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 11) सकाळी उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हातोबानगर येथे रस्त्याच्या बाजूला मालवाहतूक तीन चाकी टेम्पो पार्क केले होते. टोळक्याने या टेम्पोच्या काचा फोडून नुकसान केले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.