Amitabh Bachhan: महानायक अमिताभ बच्चन यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून दिला डिस्चार्ज

Veteran actor Amitabh Bachchan arrives at his residence Jalsa in an ambulance, after testing negative for COVID19 काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

0

एमपीसी न्यूज – महानायक अमिताभ बच्चन यांनी कोरोनावर मात केली आहे. नुकतंच अभिनेता अभिषेक बच्चन यांनी ट्विट करत याबाबतची माहिती केली. अमिताभ बच्चन यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

माझ्या वडिलांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या ते घरी आराम करत आहेत, असे ट्विट अभिषेक बच्चन यांनी केले आहेत. मी लवकरच कोरोनाला हरवून घरी येईन, असेही अभिषेक बच्चन म्हणाले.

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती 11 जुलै रोजी रात्री उशिरा समोर आली होती. तर दुसऱ्या दिवशी दुपारी म्हणजेच 12 जुलै रोजी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि मुलगी आराध्या बच्चनलाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like