Nigdi News: ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र देशपांडे यांचे निधन

एमपीसी न्यूज – ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक रामचंद्र गोपाळ देशपांडे (वय 86) यांचे निगडी यमुनानगर येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. 

त्यांच्या मागे पत्नी, 2 मुलगे, एक मुलगी, सून व 3 नातू असा परिवार आहे. रामचंद्र देशपांडे यांच्या पार्थिवावर निगडी येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

रामचंद्र देशपांडे हे गोवा मुक्ती संग्रामात सहभागी झाले होते. ज्येष्ठ नागरिक संघाचे ते सक्रिय सदस्य होते. नामवंत होमिओपॅथीतज्ज्ञ डॉ. शैलेश देशपांडे यांचे ते वडील होत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.