Ashish Chandorkar : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज : ज्येष्ठ पत्रकार आशिष चांदोरकर (Ashish Chandorkar) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे वयाच्या 44 व्या वर्षी पहाटे राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात एक बहिण व कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात 20 वर्षांहून अधिक वर्ष काम केले. त्यांच्या खाद्य भ्रमंतीचे वाचक चाहते होते. ते सर्वज्ञ मीडीया सर्व्हिसेसचे सचांलक होते. क्रीडा, राजकारण, समाजकारण, पर्यटन आणि खाद्यभ्रमंती या विषयांवर त्यांचे लिखाण प्रसिद्ध होते. मनसोक्त खा आणि जीवनाचा आनंद लुटा हेच हे वाक्य त्यांचे प्रसिद्ध होते.

Raju Srivastava : सर्वांना खळखळून हसवणारा ‘गजोधर’ मात्र दुर्मिळ झाला…

भटकंती आणि खाद्यसंस्कृतीबद्दल अधिकाधिक (Ashish Chandorkar) जाणून घेण्याची त्यांना आवड होती. या आपल्या ‘आवडी’मुळे त्यांनी पुणे, महाराष्ट्र आणि देशभरात हिंडून तिथल्या खाद्यसंस्कृतीची ओळख वाचकांना करून दिली. त्यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर लिहिलेले ‘मॅन ऑन मिशन महाराष्ट्र’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.