Maharashtra Bhushan Award : ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान

एमपीसी न्यूज : राज्याचा सर्वोच्च ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार गेली सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या  ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. शाल, मानचिन्ह आणि 25 लाख रुपयांचा धनादेश असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. गेट वे ऑफ इंडिया येथे एका दिमाखदार सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.(Maharashtra Bhushan Award) यावेळी उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उपस्थित होता. 

 

या पुरस्कार स्वीकारल्यानंतर आशा भोसले म्हणाल्या की, ”महाराष्ट्र भूषण हा सन्मान घरच्यांनी दिला, तो मला भारतरत्न सारखा आहे.”

Maharashtra : वाहतूक शिस्तीसाठी जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अद्ययावत ITMS बसवणार – उपमुख्यमंत्री

 

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या आवाजाने विविध छटांची हजारो गाणी अजरामर करणाऱ्या आशाताई यांचा 1933 साली जन्म झाला. (Maharashtra Bhushan Award) आशाताईंना लहानपणापासूनच गाण्याची आवड होती. 1943 साली त्यांनी आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली आणि 1948 साली त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गाण्याची संधी मिळाली. त्यानंतर पुढची सात दशकं आशाताईने आपल्या सुमधुर आवाजाने लाखो रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.