Bhosari: बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत तरूणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत एका तरूणीवर तरूणाने बलात्कार केल्याची घटना घडल्याची नुकतीच भोसरी, एमआयडीसी येथे उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

टेकराज व्दारका ओढ (रा. अर्जुन इंजिनिअरींग कंपनी समोरील झोपडपट्टी, एमआयडीसी, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत तरूणीने भोसरी, एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरूणीच्या बहिणीला जिवे मारण्याची धमकी देत आरोपी टेकराज याने तिच्यावर गेल्या दोन वर्षांपासून बलात्कार केला. तसेच तिला लाथाबुक्यांनी मारहाणही केली. आरोपी टेकराजला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. भोसरी, एमआयडीसी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.