Koregaon Park : वेश्या व्यवसायातून पीडितेची सुटका

एमपीसी न्यूज – कोरेगाव पार्क येथून एका पीडित मुलीची वेश्या व्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. तर वेश्या व्यवसाय करवून घेणा-या एजंटवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई दि. 15 मे ला कोरेगाव पार्क पोलिसांकडून करण्यात आली.

आलोक (पूर्ण नाव माहित नाही), असे या एजंटचे नाव आहे.

कोरेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना त्यांच्या बातमीदारामार्फत आरोपी एजंट हा त्यांच्या साथीदारांच्या सहाय्याने मुलींचे फोटो पाठवून वेश्या व्यवसायासाठी मुलींना कोरेगाव पार्क येथील जी रेसिडेन्सी हॉटेलवर पाठवितो. आणि त्यातील ठाराविक रकम स्वीकारतो, अशी माहिती मिळाली.

त्यानुसार, पोलिसांनी जी रेसिडेन्सी हॉटेल येथे छापा घालून पीडित मुलीची सुटका करण्यात आली. या मुलीकडून आलोक, आर्यन मेहता आणि गोरख शर्मा हे वेश्या व्यवसाय चालवत असल्याचे समजले. हे एजंट गरीब घरातील मुलींच्या गरिबीचा फायदा घेऊन तिला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असत, असे तपासात निष्पन्न झाले.त्यानुसार या एजंटांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडितेला रेस्क्यू फाऊंडेशन हडपसर येथे पाठविण्यात आले आहे. कोरेगाव पोलीस अधिक तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.