Vadgaon Maval News : वडगाव येथे मराठ्यांच्या विजयदिन सोहळ्याचे आयोजन

एमपीसी न्यूज – मराठयांच्या इतिहासातील अखेरचा विजय हा वडगावच्या भूमीत नोंदला गेला आहे. 1779 साली मराठयांनी श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा मानहानीकारक पराभव केला होता. त्या विजयाच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी महाराष्ट्र गिरीभ्रमण संस्था, महाराष्ट्र जिमखाना, गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था यांच्या वतीने रविवारी (दि. 16) वडगाव येथे विजयदिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती ॲड. रवींद्र यादव यांनी दिली.

महाराष्ट्र गिरीभ्रमण संस्थेच्यावतीने दरवर्षी 16 जानेवारीला विजयदिन साजरा केला जातो. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मर्यादित स्वरूपात, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी 10 वाजता नर्मदा परिक्रमा पूर्ण केलेल्या व्यक्तींच्या हस्ते, विजय स्मारकावरील श्रीमंत महादजी शिंदे यांच्या पुतळ्याचा अभिषेक होईल.या व्यक्तींचा महाराष्ट्र गिरिभ्रमण संस्थेच्यावतीने, मैय्यापुत्र व मैय्यापुत्री पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

सायंकाळी सात वाजता दीपोत्सव साजरा होईल. दुर्गवीर पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती संयोजकांकडून करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.