Bhosari : विदर्भवासियांचा स्नेह मेळावा उत्साहात 

एमपीसी न्यूज – सुपो प्रतिष्ठाण आणि विदर्भ मित्र मंडळाच्या वतीने विदर्भवासियांकरिता दिवाळी सणाच्या उत्तरार्धात आयोजित केलेल्या स्नेह फराळाच्या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. 

दिघी रोड, कॉलनी, विदर्भ भवनातील कै. पंढरीनाथ भोंगाळे सभागृहात रविवारी (दि.18)हा स्नेह मेळावा पार पडला. गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी संजोयिका कविता कडू-पाटील, विदर्भ मित्र मंडळाचे अध्यक्ष हरिभाऊ तांदळे, सामाजिक कार्यकर्ते आप्पा घुले, दिघी शिवसेना शाखाप्रमुख नंदा दातकर, उद्योजक मुरलीधर साठे उपस्थित होते.

कविता कडू म्हणाल्या, ‘स्नेह फराळाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड परिसरात स्थित असलेले विदर्भवासिय प्रथमच एकत्र आले. दैनंदिन कामकाजाकरिता विखुरलेल्या भुमिपुत्रांनी एकत्र यावे. एकमेकांची सुख, दु:ख वाटून घ्यावीत. दैनंदिन जीवणात येणा-या अडीअडचणी सोडवाव्यात. मातृभूमीच्या विकासाकरिता यथाशक्ती एकमेकांना सहाय्य करावे. एक उन्नत व आदर्स समाज घडविण्याकरिता हातभार लावावा’

उद्योजक अरुण इंगळे यांचा सत्कार श्रीकृष्ण वावगे यांच्या हस्ते करण्यात आली. सुपो प्रतिष्ठाणचे अध्यक्ष विनायक भोंगळे, विदर्भ मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष ओमकार काटोळे, सल्लागार नागेश वसतकार, प्रा. दिगंबर ढोकले, सुखदेव वानखेडे यांनी देखील मार्गदर्शन केले. विदर्भ मित्र मंडळाचे सुमारे एक हजार सभासद आहेत. मंडळातर्फे वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.