Pune : हॉस्पिटलमधील चेंजिंग रूममध्ये काढला महिलेचा व्हिडीओ; एकाला अटक

एमपीसी न्यूज :-एमआरआय स्कॅन करण्यासाठी आलेल्या महिलेचा हॉस्पिटलच्या चेंजिंग रूममध्ये छुप्या कॅमेराने व्हिडीओ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
ही घटना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये शनिवारी (दि.26) घडली असून याप्रकरणी पोलिसांनी वार्ड बॉयला अटक केली आहे.
लंकेश लहू उत्तेकर (वय 25, रा.धानोरी) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.
याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने कोरेगाव पार्क पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला पोटामध्ये दुखत असल्यामुळे रुग्णालयात एमआरआय स्कॅन करण्यासाठी आपल्या पतीसोबत  शनिवारी आली होती. परंतु महिलेला कपडे बदलण्यासाठी चेंजिंग रूमऐवजी दुसऱ्या खोलीत पाठवण्यात आले. दरम्यान महिलेला त्या खोलीमध्ये एक मोबाईल दिसला आणि त्या मोबाईल मध्ये महिलेचा कपडे बदलताना चा व्हिडीओ रेकोर्ड देखील झाला होता.
महिलेने हा प्रकार पतीला कळविला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी वार्ड बॉयला ताब्यात घेतले.असून पुढील तपास कोरेगाव पार्क पोलीस करत आहेत.परंतु व्हिडीओ काढणारा लंकेश हा रुग्णालयाचा कर्मचारी नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.