Vidhan Parishad Election : रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांचे प्रत्येकी एक मत बाद

एमपीसी न्यूज : आज विधान परिषदेची निवडणूक (Vidhan Parishad Election) पार पडली. पहिल्या टप्प्यातील मतमोजणीला प्रारंभ झाला असून, पहिल्याच टप्प्यात रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांचे प्रत्येकी एक मत बाद झाले आहे. त्यावरून आता महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात वाद सुरू झाला आहे. 

Jan Sanvad Sabha : जनसंवाद सभेला प्रचंड प्रतिसाद! आतापर्यंत 1 हजार 633 नागरिकांचा सहभाग

महाविकास आघाडीचे आमदार रामराजे निंबाळकर तर भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाले आहे. त्यामुळे दोन्ही गटात आता वाद सुरू झाला आहे. दोन्ही गटाने एकमेकांच्या मतांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे आता मत मोजणीला विलंब (Vidhan Parishad Election) होत आहे. तसेच, दोन्ही गटाचे मत बाद झाल्याने दोन्ही गटात तणावाचे वातावरण आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट, अग्निपथ योजनेसह ‘हा’ मुद्दा केला उपस्थित

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.