Pune : सार्वजनिक नवरात्र महोत्सवानिमित्त नाना पेठ येथे यंग भोर्डे मित्र मंडळातर्फे सप्तमातृका मंदिराचा देखावा

एमपीसी न्यूज – नाना पेठमधील यंग भोर्डे आळी मित्र मंडळतातर्फे सार्वजनिक नवरात्र महोत्सवानिमित्त यंदा श्री सप्तमातृका मंदिराचा देखावा उभारण्यात आला आहे, अशी माहिती यंग भोर्डे आळी मित्र मंडळ सार्वजनिक नवरात्र महोत्सवाचे अध्यक्ष माजी नगरसेवक व शिवसेनेचे पुणे सहसंपर्क प्रमुख  अजय भोसले यांनी दिली.

_MPC_DIR_MPU_II

नवरात्रामध्ये भजन, कीर्तन, श्री सूक्त पठण व भोंडला आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (दि. १३) कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ११ ते ४ महाप्रसाद, सायंकाळी ७ ते १० नगरप्रदक्षिणा व रात्रौ १० वाजता दुग्धपान कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.