Vijay Bhosale : पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते विजय भोसले यांना पत्रकार महर्षी प्र. के. अत्रे पुरस्कार

एमपीसी न्यूज – सुदृढ, समृद्ध व तीक्ष्ण पत्रकारिता करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन थोर समाजसेवक आणि पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांनी शनिवारी काळेवाडी येथे पुरस्कार सोहळ्यात केले.

मराठी पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य संलग्न पिंपरी – चिंचवड शहर पत्रकार संघाच्यावतीने जेष्ठ पत्रकार विजय भोसले  (Vijay Bhosale) यांना पत्रकार महर्षी प्र. के. अत्रे पुरस्कार 2022 देऊन गौरव करण्यात आला. यावेळी व्ही.एस.आर.एस न्युज मीडिया ग्रुपचे मुख्य संपादक डॉ. लालबाबू गुप्ता, मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे, शहराध्यक्ष दादाराव आढाव इत्यादी उपस्थित होते.

Maharashtra Political Crisis : स्वत:च्या बापाच्या नावानं मते मागा – उध्दव ठाकरे

 

गिरीश प्रभुणे म्हणाले की, सध्याच्या आधुनिक युवामध्ये पत्रकारितेची बिकट वाट आहे. स्वतःचा तोल स्वतः ला सावरावा लागतो कोणीही मदतीला येत नाही मी स्वतः पत्रकारिता केली असून आठ पानाचे साप्ताहिक वर्तमानपत्र प्रकाशित करत होतो.
मी सडेतोड लेख लिहिल्यामुळे माझ्या घरावरही हल्लेखोरांनी हल्ले केले आहेत.

प्रमुख पाहुणे डॉ. लालबापू गुप्ता म्हणाले की, राजकारण, समाजकारण अथवा प्रशासनामध्ये न्याय मिळत नसेल तर शेवटी नागरिक पत्रकारांकडे धाव घेतात हा जो पत्रकारांप्रति विश्वास आहे तो विश्वास पत्रकारांनी कायम ठेवला पाहिजे. नव्याने स्थापन झालेल्या संघटना व पदाधिकाऱ्यांना व्ही. एस आर एस न्युज मीडिया ग्रुप नेहमीच बरोबर असेल.

 

सत्कारमूर्ती विजय भोसले सत्कारास उत्तर देताना म्हणाले की, नव्याने स्थापन झालेल्या संघाने माझा जो पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते पत्रकार महर्षी प्र.के अत्रे पुरस्कार देऊन गौरव केला त्याबदल संघाचे मी आभार व्यक्त करतो. पिंपरी – चिंचवड शहर संघटना ही जरी नवीन असली तरी संघटनेत काम करणारे पदाधिकारी जुनेच आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गोरे हे पत्रकारांसाठी गेली अनेक वर्षे काम करत आहेत. कोरोनाच्या भीषण काळात घरोघरी जाऊन अन्नदान केले हा त्यांचा उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे.

यावेळी माजी नगरसेवक कैलास थोपटे, युवक कॉग्रेसचे शहरध्यक्ष नरेंद्र बनसोडे,  आर. पी. आयचे अजीज शेख, काँग्रेसचे अशोक मोरे,  बी.आर.माडगूळकर उपस्थितीत होते. यावेळी पिंपरी- चिंचवड शहर पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारणीचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे आभार शहराध्यक्ष दादाराव आढाव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.