Vijay Jewellers : विजय ज्वेलर्स आता आळंदीकरांच्या सेवेत, अभिनेत्री ज्ञानदाच्या हस्ते द्वितीय शाखेचा शुभारंभ

एमपीसी न्यूज : शुद्धता व नाविन्याची कास याबरोबरच भरगोस ऑफरसह विजय ज्वेलर्स आळंदीकरांच्या सेवेत दाखल झाले आहेत. वि.ज.बिडकर ज्वेलर्स अँड सन्स प्रा.लि. यांच्या विजय ज्वेलर्स या द्वितीय शाखेचे ठिपक्यांची रांगोळी फेम अभिनेत्री ज्ञानदा रामतिर्थकर म्हणजेच सर्वांची लाडकी अप्पू तसेच खेड विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.30 सप्टेंबर) रोजी उद्घाटन झाले.(Vijay Jewellers) ही नवीन शाखा आळंदीत देहुफाटा येथील एम.आय.टी.ज्युनिअर महाविद्यालयाच्या समोर खुली करण्यात आली आहे.

या उद्घाटन प्रसंगी विजय जयदेव बिडकर,ओंकार विजय बिडकर. कल्याणी विजय बिडकर, अश्विनी बिडकर,श्रीहरी बिडकर आदी उपस्थित होते.

 

धुमधडाक्यात शुभारंभ  करत विजय ज्वेलर्स तर्फे नागरिकांसाठी ऑफर व लकी ड्रॉ चा पाऊस पाडण्यात आला आहे. यामध्ये लकी कुपन योजना विजय ज्वेलर्स यांनी आणली असून ती 30 सप्टेंबर ते 30 ऑक्टोबर या एक महिन्याच्या कालावधीत राबवली जाणार आहे.(Vijay Jewellers) खरेदीवर हमखास कुपन मिळणार असून या कुपनचा 6 नोव्हेंबर रोजी लकी ड्रॉ जाहीर होणार आहे. यामध्ये नागरिकांना  सोन्याच्या अंगठी पासून फ्रीज, वॉशींग मशीन, एलसीडी, वॉटर प्युरिफायर, इलेक्ट्रिक पिठाची गिरण अशी घसघशीत बक्षिसे मिळणार आहेत. याबरोबरच दहा हजाराच्या खरेदीवर हमखास भेटवस्तू दिली जाणार आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याचा कट रचला जात असल्याची खोटी माहिती देणाऱ्या आरोपीस अटक

वरील हंगामी ऑफर बरोबरच विजय ज्वेलर्स खास सुवर्ण संचय भिशी योजना देखील घेऊन आले आहेत. यामध्ये ग्राहकांना महिन्याकाठी केवळ एक हजार रुपये अकरा महिन्यासाठी गुंतवायचे आहेत.(Vijay Jewellers) या गुंतवणूकीवर  विजय ज्वेलर्स 12 वा हप्त्याचे हजार रुपये स्वतः भरतील. त्यानंतर 13 व्या महिन्यात ग्राहकांना 12 हजार रुपयांचा सोन्याचा किंवा चांदिचा दागिना घेता येणार आहे.

ऐन दसरा-दिवाळीच्या शुभमुहुर्तावर दागिने खरेदीचा विचार करत असाल आणि काही तरी नवीन धाटणीच्या दागिन्यांच्या शोधात असाल तर विजय ज्वेलर्स यांना नक्की भेट द्या कारण ते दागिना तर देतात तो पण ऑफर सकट…

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.