Pune News : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित सतीश तारे करंडक राज्यस्तरीय स्किट स्पर्धा

एमपीसी न्यूज : विजय पटवर्धन फाऊंडेशन आयोजित सतीश तारे करंडक राज्यस्तरीय स्किट स्पर्धेत  थिएटरकरसोलापूरच्या प्रपोजलने सांघिक प्रथम क्रमांक पटकाविला असून संघास 20 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानचिन्ह प्रदान करण्यात आले.(Pune News) नाट्याहोलिक क्रिएशन्सपुणेच्या अ वॉक टू रिमेंबरला सांघिक द्वितीय तर दृष्टीपुणेच्या अतिताप आणि शकुंतला‘ या स्किटला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. या संघांना अनुक्रमे 15 हजार आणि 10 हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि मानचिन्ह देण्यात आले. प्राथमिक फेरीतील लक्षवेधी स्किट म्हणून अभिजातपुणेच्या बतावणी – इव्हेंट घडणार आहेची निवड करण्यात आली.

स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून स्पर्धेत यंदा 40 संघांनी सहभाग नोंदविला होता. प्राथमिक फेरीतून नऊ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. अंतिम फेरी रविवारी भरत नाट्य मंदिरात झाली. त्यानंतर विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. पारितोषिक वितरण ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले, सतीश तारे यांच्या मातोश्री जयश्री तारे, भगिनी आसावरी तारे, परिक्षक सुयश टिळक, संतोष पवार, विशाल इनामदार, श्रीकांत यादव, फाऊंडेशनचे अध्यक्ष विजय पटवर्धन, मंगल इन्फोटेकचे सचिन नगरकर, किशोर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

स्किटमधून वैचारिक गुदगुल्या व्हाव्यात : श्रीरंग गोडबोले

भूमिका करताना जोपर्यंत विचारांची बैठक नसते तोपर्यंत उत्तम विनोदाची निर्मिती होत नाही. विनोद रांगडा असला तरी सशक्त असावा, अशी अपेक्षा श्रीरंग गोडबोले यांनी व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, स्किटच्या माध्यमातून सद्यस्थितीवर भाष्य करताना निर्भयपणे भूमिका साकारणे महत्त्वाचे असते.(Pune News) स्किटमधून वैचारिक गुदगुल्या झाल्या पाहिजेत. नाटकाच्या तंत्राचा उत्तम वापर ही सतीश तारे यांची ताकद होती, ते हरहुन्नरी कलाकार होते असे त्यांनी सतीश तारे यांच्या आठवणी सांगताना नमूद केले.

परिक्षकांच्या वतीने बोलताना संतोष पवार यांनी स्पर्धकांना उपयुक्त सूचना केल्या. आसावरी तारे यांनी सतीश तारे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

Moshi News : राडारोडा कचरा व्यवस्थापनाबाबत बुधवारी कार्यशाळा

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

प्राथमिक फेरीतील उत्तेजनार्थ पारितोषिके – (स्पर्धकाचे नाव आणि स्किट या क्रमाने) – पुरुष – किशोर कांबळे (यमदूत – खट्याळ सासू), पुष्कर कुलकर्णी (मिसमॅच), तेजस राजे (मुलाखत). स्त्री – शांभवी धामणीकर (मिसमॅच), अनुजा चौधरी (कलेचा शंख), संयोगीता करंजुले (मुलाखत).

सर्वोत्कृष्ट विनोदवीर – पुरुष – अभिजित केंगार (प्रपोजल). स्त्री – अक्षता साळवी (आम्ही दोघी बहिणी).

अभिनय – पुरुष – द्वितीय – वैभव महाले (अतिताप आणि शकुंतला), तृतीय – ओंकार यादव (अ वॉक टू रिमेंबर), उत्तेजनार्थ – बळी डिकले (बहुरूपी), मनोज झुंगा (बहुरूपी), विश्वजीत होनप (द गाय).

अभिनय – स्त्री – द्वितीय – भावना प्रसादे (इ सापनिती), तृतीय – अश्विनी सुजित (भाषा), उत्तेजनार्थ – श्रावणी धुमाळ (अ वॉक टू रिमेंबर), धनश्री निकम (व्हॉटस्‌‍ॲप डाऊन), पायल साळंखे (अतिताप आणि शकुंतला).

सर्वोत्कृष्ट लेखन – नवलाजी जाधव (हबुरूपी).

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – स्वप्निल जगताप (आम्ही दोघी बहिणी).

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.