Vijay Shivtare : बंडखोरीनंतर विजय शिवतारेंचा पहिला विजय, ग्रामपंचायत निकालात बाजी मारली

एमपीसी न्यूज : राज्यात झालेल्या सत्ता नाट्यानंतर शिवसेनेत दोन गट पडले. यामध्ये शिवसेनेतील बहुतांश जुने नेते आणि पदाधिकारी शिंदे गटात सहभागी झाले. पुणे जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. शिवसेनेचे जुने नेते म्हणून ओळख असलेले शिवाजीराव आढळराव पाटील, खासदार श्रीरंग बारणे आणि माजी मंत्री विजय शिवतारे हेदेखील शिंदे गटात सहभागी झाले. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बंडखोरी केल्यानंतर पुन्हा एकदा ते राजकारणात सक्रिय झाले. नुकत्याच पुरंदर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी शिंदे गटाला विजय मिळवून दिला. 

पुरंदर तालुक्यातील सिंगापूर व बहिरवाडी या दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या. या दोन्ही ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने मुसंडी मारली आहे. सिंगापूर ग्रामपंचायतीच्या सात पैकी पाच जागा शिंदे गटाने जिंकल्या तर बहिरवाडी ग्रामपंचायतच्या सात पैकी चार जागा मिळवून शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ग्रामपंचायतीचा हा निकाल पाहता शिंदे गटात गेलेले माजी मंत्री विजय शिवतारे यांच्या पाठीशी असल्याचा इशाराच गावकऱ्यांनी दिला आहे.

Kurkumbh Industrial Estate : एमक्योर फार्मास्युटिकल्स लिमिटेडमध्ये 30 लाख किंमतीची पावडर चोरीला

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी सासवड येथे जाहीर सभा घेतली होती. या सभेला पुरंदर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यानंतर पार पडलेल्या येथील ग्रामपंचायत निवडणुकीत नागरिकांनी एकनाथ शिंदे यांच्या गटालाच साथ देखील दिल्याचे (Vijay Shivtare) आता दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.