Dighi News : दिघी विकास मंचातर्फे ‘इ’ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – दिघी विकास मंचातर्फे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘इ’ प्रभाग अध्यक्षपदी दुस-यांदा निवड झाल्यानिमित्त नगरसेवक विकास डोळस यांचा आज (शनिवारी) सत्कार करण्यात आला.

मंचाचे संस्थापक सुनील काकडे, मार्गदर्शक के.के.जगताप, पांडुरंग म्हेत्रे, खजिनदार दत्ता घुले, रज्जाक पठाण, कुंडलिक आदक, दिव्या शिक्षण संस्थेचे संचालक इंद्रजीत भोसले, कुंडलिक आदक, सतीश खरात, मराठवाडा विकास संस्थेचे अध्यक्ष प्रकाश इंगोले, धनाजी कोंडजे, संदीप पंडीत, जयराम लिमशे, ओम साई स्कुलचे पांडुरंग म्हेत्रे, रमेश विरनक, बाळासाहेब सुपे, सलीम शेख, कुमार लोमटे आदी उपस्थित होते.

दिघी-बोपखलेचे प्रतिनिधित्व करत असताना विकास डोळस यांनी मागील साडेचार वर्षांत विकासकामांचा डोंगर उभा केला. ‘इ’ प्रभाग अध्यक्षपदाच्या माध्यमातून या भागातील विकास कामांना गती दिली. त्यांच्या कामाचे आम्हाला कौतुक, अभिमान आहे. त्यांची प्रभाग अध्यक्षपदी दुस-यांदा निवड झाल्यानिमित्त मंचातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आल्याचे मंचाचे संस्थापक सुनील काकडे यांनी सांगितले.

”दिघी भागातील नागरिकांनी करत असलेल्या कामाबाबत सत्कार करुन कौतुकाची थाप दिली. त्यामुळे काम करण्यास उत्साह वाढतो. दिघी विकास मंचाच्या सर्व सदस्य, मार्गदर्शकांचे मी मनापासून आभार मानतो”, असे ‘इ’ प्रभाग अध्यक्ष विकास डोळस सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.