-MPC-TOP-MOST-BANNER-I

Vikasnagar News : युवा सेनेच्यावतीने वटपौर्णिमेनिमित्त सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपट्यांचे वाटप

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : कोरोना संकटात आलेल्या वटपौर्णिमा सणासाठी महिलांना आपल्या घराजवळ तेही आपल्याच सोसायटीत किंवा कॉलनीत वटवृक्षाची पूजा करता यावी यासाठी युवा सेनेचे पिंपरी चिंचवड शहर उपअधिकारी राजेंद्र तरस किवळे-विकासनगर येथील सोसायट्यांमध्ये वडाच्या रोपांचे वाटप केले.

कोरोनाच्या नियमांमुळे सार्वजनिक ठिकाणी वटपौर्णिमा साजरी करण्यावर निर्बंध असल्याने आणि कोरोनाची भीती अशा संकटात उद्याची वटपौर्णिमा कशी साजरी करायची या चिंतेत असलेल्या महिलांना राजेंद्र तरस यांच्या या अनोख्या उपक्रमाने मोठा दिलासा मिळाला. नव्हे संकटात आपला भाऊच आपल्या मदतीला धावून आला, अशा भावना काही महिलांनी व्यक्त केल्या.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पिंपरी चिंचवड युवा सेना आणि राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी वडाच्या रोपांचे वाटप आणि सोसायटी आवारात रोपण करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. विकासनगर परिसरातील मंगलविश्व सोसायटी, क्रिसंता स्कायलीने व इतर सोसायट्यांना वडाचा रोपांचे वाटप करण्यात आले.

या वेळी सुनीता चंदणे, आरती बाबर, शितल एकाड, स्मिता तरस, सिमना नायर, अर्चना घोरपडे, वैशाली साबळे,प्रणाली निकम, रुपाली महाजन, सुवर्णा गायकवाड, स्नेहल मोदी, प्रिया माजगावकर, अपेक्षा जोंधळे, वेदिका कांबळे आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनचा खूप मोठा तुटवडा निर्माण झाला. निसर्गाचा होत चाललेला ऱ्हास व दिवसेंदिवस वृक्षांची होणारी कत्तल या सर्व गोष्टी विचारात घेतल्यास मानवाचे भविष्यातील जीवन जगणे खूप कठीण होणार आहे. त्यामुळे वटपौर्णिमेचे औचित्य साधून विकासनगर भागातील सोसायट्यांना वडाच्या रोपांचे वाटप करण्यात आले. त्याचा उपयोग उद्या साजऱ्या होत असलेल्या वटपौर्णिमेला होणार आहे. मात्र, केवळ सणासाठी वडाची पूजा न करता ती दररोज त्या वडाला पाणी घालून केल्यास वृक्ष संवर्धन होण्यास मदत होणार आहे. राजेंद्र तरस : युवा सेना उपशहर अधिकारी, पिंपरी चिंचवड.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.