Vikasnagar News : राजेंद्र तरस यांचे लोकाभिमुख कार्य कौतुकस्पद – खासदार श्रीरंग बारणे

किवळे- विकासनगरच्या जनतेसाठी वैकुंठ रथाचे लोकार्पण

एमपीसीन्यूज : मृत्यूनंतर स्मशानापर्यंत आणि अंत्यसंस्कार होईपर्यंत  शोकाकुल कुटुंबियांना भेडसावणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी  राजेंद्र तरस ( Rajendra Taras) यांनी वैकुंठ रथ (Vaikunth Rath) उपलब्ध करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे. या वैकुंठ रथाचा चांगला उपयोग सर्व जाती धर्माच्या नागरिकांसाठी होईल. त्यांचे हे लोकाभिमुख (People oiented)  कार्य कौतुकास्पद ( commandable) आहे, असे गौरवोदगार शिवसेना खासदार श्रीरंग बारणे (Shivsena MP Shrirang Barne) यांनी काढले.

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी किवळे, विकासनगर आणि परिसरातील जनतेसाठी मोफत वैकुंठ रथ उपलब्ध करुन दिला.  या रथाचे लोकार्पण खासदार बारणे यांच्या हस्ते मंगळवारी ( दि. 26 ) करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

राजेंद्र तरस यांनी कोरोना संकट आणि लॉकडाऊन कालावधीमध्ये स्थानिक जनतेसाठी केलेल्या मदतीचा उल्लेख करुन श्री. बारणे यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच स्थानिक जनताही आगामी काळात निश्चित राजेंद्र तरस यांना साथ देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या प्रसंगी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ, नगरसेविका संगीता भोंडवे, देहूगाव येथील संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष मधुकर महाराज मोरे, विश्वस्त माणिक महाराज मोरे,  युवा सेना मावळ तालुका अधिकारी अनिकेत घुले, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, किवळे गावचे पोलीस पाटील दिलीप तरस, किवळे रावेत सोसायटीचे माजी चेअरमन बाळासाहेब तरस, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, संजय पिंजण, अरुण गोंटे, बाप्पू तरस, रवींद्र कदम, हंबीरराव आवटे, धर्मपाल तंतरपाळे, आबा दांगट, विशाल दांगट, रामदास अल्गीरे आदी उपस्थित होते.

खासदार बारणे पुढे म्हणाले, श्री राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून कै. तुकाराम तरस, कै. दत्तात्रय तरस, कै. अशोक बनसोडे, कै. वेणूबाई तरस यांच्या समरणार्थ हा वैकुंठ रथ उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून राजेंद्र तरस यांनी लोकहिताचे कार्य केले आहे. विकासनगर व परिसरात अनेक जाती धर्माचा समाज राहत आहे. त्यांना अंत्यविधीसाठी अनेक अडचणी येत असतात. विकासनगरपासून किवळे गाव आणि शितळानगर स्मशानभूमी दूरवर आहे. त्यामुळे अंत्ययात्रेच्यावेळी नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र, आता अंत्ययात्रेची काळजी राजेंद्र तरस यांनी घेतली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.