Vikasnagar News : पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विकासनगर येथे शिवणकला आणि मेहंदी प्रशिक्षण वर्ग

एमपीसीन्यूज : राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या रविवारी ( दि. 21 ) विकासनगर-किवळे येथे मोफत शिवणकला आणि मेहंदी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारी सकाळी साडे अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात येणार आहे.

_MPC_DIR_MPU_II

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर, महापालिका विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, स्थानिक नगरसेविका प्रज्ञा खानोलकर, माजी नगरसेवक मनोज खानोलकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

हे दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम प्रभाग क्रमांक 16 मधील महिला आयोजित करण्यात आले आहेत. त्यासाठी नावनोंदणी आवश्यक आहे.

त्यासाठी इच्छुक महिलांनी माजी नगरसेवक मनोज खानोलकर यांच्या विकासनगर येथील कार्यालयात 8796 850009 किंवा 9322623622  या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कार्यक्रमाच्या आयोजिका व राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष अर्चना राऊत यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.