Vikasnagar News : किवळेगावच्या युवसैनिकाची माणुसकी ! चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी ट्रकभर साहित्य रवाना

एमपीसीन्यूज : पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली आणि कोल्हापूर तसेच कोकणातील महाड तळिये आणि चिपळूणसह अन्य भागातील पूरग्रस्त नागरिकांना राज्यभरातून शक्य ती मदत विविध राजकीय पक्ष, संस्था संघटनानांकडून सुरु आहे. किवळे-विकासनगर येथील युवसैनिक राजेंद्र तरस यांच्या पुढाकारातून चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी ट्रकभर गरजेचे साहित्य रवाना करण्यात आले.

देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांच्या हस्ते ट्रकसमोर श्रीफळ वाढवून हा ट्रक पुरग्रस्तांसाठी चिपळूणकडे रवाना करण्यात आला. यावेळी युवा सेना उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण, रामनिवास गुप्ता, अन्वर तांबोळी, विनोद बनसोडे, संतोष कोळपे, उद्योजक राजेश मांढरे, राकेश मांढरे आदी उपस्थित होते. उद्या पिंपरी चिंचवड युवा सेनेचे पदाधिकारी ही सर्व मदत चिपळूणमधील पूरग्रस्तांकडे सुपूर्द करणार आहेत.

या साहित्यामध्ये 5 ते 15 वयोगटातील लहान मुलांसाठी नवीन कपडे व जर्किंग, जीवनावश्यक साहित्याचे किट, बिस्किट आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे बॉक्स आहेत.

किवळे-विकासनगर परिसरात कोकणी समाजबांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. त्यांचा माध्यमातून महाड आणि चिपळूण परिसरातील पुरग्रस्तांच्या व्यथा जाणून घेतल्या. संकटात असलेल्या आपल्या समाजबांधवांना सर्वतोपरी मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार युवा सेना आणि राजेंद्र तरस सोशल फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जीवनावश्यक साहित्य चिपळूणच्या पूरग्रस्तांसाठी आज रवाना करण्यात आले. परिसरातील दानशूर व्यक्ती मित्र परिवार आणि आपण स्वतः यात योगदान दिले असल्याचे राजेंद्र तरस यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.