Vikasnagar News : ‘किवळे- विकासनगरमधील महावितरणच्या उघड्या डिपींना झाकणे बसवा’

युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांची महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे मागणी

एमपीसीन्यूज : किवळे आणि विकासनगर परिसरात अनेक ठिकाणी महावितरणच्या डिपींना झाकणे नाहीत. काही ठिकाणी झाकणे तुटलेली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने या भागातील उघड्या डिपींना झाकणे बसवावीत तसेच नादुरुस्त डिपींची दुरुस्ती करावी, अशी मागणी युवा शिवसैनिक राजेंद्र तरस यांनी केली आहे.

याबाबत तरस यांनी निगडी -प्राधिकरण येथील महावितरण कार्यालयात कार्यकारी अभियंता चौधरी यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.

किवळे आणि विकासनगर परिसरात महावितरणच्या अनेक डीपी आहेत. त्यातील काही डिपींची दुरवस्था झाली आहेत, तर काहींना झाकणेच नाहीत. काही ठिकाणी झाकणे तुटलेल्या अवस्थेत असल्याचे पाहायला मिळते.

उघड्या डिपींमुळे उंदीर, मांजर आदी प्राण्यांना विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू  झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच काही डिपी हे रस्त्याच्या मध्ये असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत आहेत. ते तातडीने रस्त्यालगत सुरक्षितस्थळी हलविण्यात यावावेत, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महावितरणच्या डिपींच्या सुरक्षेला प्राध्यान्य देत लवकरात लवकर दुरुस्ती कामे हाती घेण्यात येतील. यामध्ये ज्या डिपी धोकादायक आहेत. त्यांची प्राधान्याने दुरुस्ती केली जाईल. त्यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक करण्याचे आश्वासन महावितरणचे कार्यकारी अभियंता चौधरी यांनी दिल्याची माहिती राजेंद्र तरस यांनी दिली.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.