Vikram Gokhale : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन

एमपीसी न्यूज : मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आज वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. या उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव 4 वाजता बालगंधर्व नाट्यमंदिर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यांच्यावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे 6 वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

विक्रम गोखले यांनी गेली पाच दशके केवळ मराठी नव्हे तर हिंदी रंगभूमीही गाजवली. नाटक, मालिका, चित्रपट या सर्व ठिकाणी त्यांनी आपल्या उत्कृष्ट भूमिकेने ठसा उमटवला होता. कठोर स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा यांमुळे त्यांना मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आदराचे स्थान होते. त्यांनी ‘तुझेच गीत गात आहे’ या मालिकेत शेवटची भूमिका केली. तर मराठीतील ‘अग्निहोत्र’ हि मालिका त्यांची प्रसिद्ध होती. तर हिंदीत ‘हम दिल दे चुके’ या चित्रपटातील एश्व्र्या रायच्या वडिलांची भूमिका त्यांची ओळख बनली होती.

Kalewadi News: फुलकळी यादव यांचे निधन

त्यांनी केवळ सिनेसृष्टीत आपल्या कलेने योगदान दिले नाही, तर स्व-मालकीची जागाही चित्रपट महामंडळाला देऊ केली होती. यासाठी त्यांनी आपले भाचे यशवंत गायकवाड यांनाही जागा देण्यास प्रवृत्त केले. दोघांनी मिळून दोन एकर जागा महामंडळाला दान दिली आहे. आजच्या रेटने या जागेचे बाजारमूल्य 5 कोटीपेक्षा अधिक आहे. काळाच्या पुढे जाऊन विचार करणारे, वयाने ज्येष्ठ आणि वर्तणुकीने आदराने दिग्गज असलेल्या कलाकाराच्या निधनाने सिनेसृष्टीमध्ये पोकळी निर्माण झाली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.