Lonavala : शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी विलास बडेकर

प्रवक्तेपदी प्रमोद गायकवाड

एमपीसी न्यूज – लोणावळा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी उपनगराध्यक्ष विलास बडेकर यांची व प्रवक्तेपदी माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी या नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळी नगरसेवक व जिल्हा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष निखिल कविश्वर व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना बडेकर व गायकवाड म्हणाले लोणावळा शहरात काँग्रेस संघटना मजबूत करत नगरपरिषदेवर पंजा फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.