Talegaon Dabhade : तळेगाव स्टेशन येथील ग्रामदैवत श्री हनुमान जयंती उत्सव रद्द

एमपीसी न्यूज : तळेगाव स्टेशन येथील ग्रामदैवत श्री हनुमान जयंतीचा चैत्र कृ पंचमी शनिवारी (दि 1 मे) होणारा उत्सव रद्द करण्यात आला आहे. उत्सवाच्या दिवशी फक्त पूजाविधी व अभिषेक, आरती व पालखी कार्यक्रम होईल. अशी माहिती पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष, ज्येष्ठ नगरसेवक व श्री हनुमान उत्सव समितीचे प्रमुख गणेश खांडगे यांनी दिली.

हनुमान उत्सव समितीच्या झालेल्या बैठकीत कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यशासन व केंद्र शासनाचा संचारबंदीचा आदेश तसेच धर्मादाय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार धार्मिक आयोजनावर घातलेले निर्बंध लक्षात घेऊन हा यंदाचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय माजी नगराध्यक्ष कृष्णराव कारके, अशोक ओसवाल, सुदर्शन खांडगे, अशोक म्हाळसकर, आयेश देसाई, विलास नांगरे, प्रदीप भोकरे  व उत्सव समितीचे प्रमुख गणेश खांडगे आदींच्या उपस्थितीत घेण्यात आला.

गर्दी टाळण्यासाठी यंदाच्या उत्सवातील मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमही रद्द केले आहेत. उत्सवाच्या दिवशी अगदी साध्या पद्धतीने केवळ पुजारी व मोजक्याच व्यक्तिंच्याच उपस्थितीत पूजाविधी व अभिषेक, आरती पालखीचा कार्यक्रम करण्यात येणार आहे.

उत्सव होणार नसल्याने भाविक जणांनी उत्सवानिमित्त स्टेशन परिसरात येऊ नये. तसेच ग्रामस्थ व बंधू भगिनींनी या दिवशी कोणीही स्टेशन विभागात किंवा मंदिरात एकत्र गर्दी करून कायदा सुव्यवस्था तसेच शासनाच्या आदेशाचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहनही उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.