Durgamata Daud : नवरात्रौउत्सव निम्मित मावळमध्ये गावोगावी दुर्गामाता दौडीचे उत्साहात आयोजन

एमपीसी न्यूज : (श्याम मालपोटे) – नवरात्र उत्सवानिमित्त मावळ तालुक्यातील (Durgamata Daud) गावोगावी आजपासून दुर्गामाता दौडीचे मोठ्या उत्साहाने आयोजन करण्यात आले होते. गेल्या पंधरा वर्षांपासून मावळ तालुक्यातील गावोगावी देव, देश, धर्माविषयी जागृती करण्यासाठी तरुण-तरुणी एकत्र येतात व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे स्फुल्लिंग जागविण्यासाठी दुर्गामाता दौडीचे आयोजन करत आहेत.

मावळ तालुक्यातील उर्से, तळेगाव, साते, लोणावळा, अंदर मावळ, सुदुंबरे, नाणे व या वर्षीपासून कान्हे येथे देखील दुर्गामाता दौडीचे आयोजन करण्यात आले. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल दुर्गा वाहिनीच्या वतीने आदिमाया-आदिशक्तीचा जागर करण्यात येत असतो. “आई जिजाऊंनी दाखवलेल्या, श्री शिवछत्रपती संभाजी महाराजांनी उज्वल केलेल्या राष्ट्रभक्ती-धर्मभक्तीच्या मार्गावर जोमाने चालण्याचे बळ मिळवण्यासाठी व अवघी तरुण पिढी सशक्त निर्व्यसनी राष्ट्रभक्त, धर्मभक्त, देशभक्त बनवण्यासाठी, उगवती तरुण पिढी श्री शिवाजी-श्री संभाजी या दोन महामृत्युंजय मंत्राच्या विचारांची, कार्यकर्तृत्वाची, ध्येयधोरणाची, इच्छाआकांक्षाची बनवण्यासाठी सुरू केलेला उपक्रम योजलेला मार्ग म्हणजे दुर्गामाता दौड.” अवघी तरुण पिढी सशक्त निर्व्यसनी राष्ट्रभक्त धर्मभक्त, देशभक्त बनवण्यासाठी आई जिजाऊंनी दाखवलेल्या मार्गावर यावी. त्यामुळे सर्वांनी आपापल्या विभागात होणाऱ्या दौडीमध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे हि आग्रहाची विनंती मावळ शिवप्रतिष्ठानचे सदस्य अवधूत धामणकर व सतीश धामणकर ह्यांनी केली आहे.

अशी संपन्न होते श्री दुर्गा माता दौड – Durgamata Daud

पहाटे 6 वाजता वीर बजरंगी तरुण व दुर्गा तरुणी एकत्र येत गावातील एका मंदिरापासून दुसऱ्या मंदिरापर्यंत हातामध्ये भगवा ध्वज व डोक्यावर भगवी टोपी परिधान करत मुखाने भारतमातेचा जयघोष करत व छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणा मंत्र म्हणत गावातून ठरलेल्या मार्गावरून मार्गक्रमण करतात. त्यानंतर समारोपाच्या ठिकाणी आरती घेत आदिशक्तीचा जागर करतात.

Housing Federation : ओला कचरा उचलणे बंद केल्यास सर्व कचरा पिंपरी-चिंचवड मनपाच्या समोर आणून टाकणार

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.