Viman nagar : आनंद विद्या निकेतन हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

एमपीसी न्यूज- विमाननगर येथील आनंद विद्या निकेतन हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संत गोरोबा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डाॅ. नामदेवराव सावंत होते. यावेळी मुख्याध्यापक नितीन घोगे, मुख्याध्यापिका डाॅ. प्रीती मानेकर व दोन्ही शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या वेशभूषा केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग सादर केले. हिंद इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अफझलखानाच्या वधाचे नाट्य सादर केले. मुलांनी पोवाडयाच्या माध्यमातून शिवरायांची शौर्यगाथा मांडली. प्रा. संतोष थोरात यांनी शिवरायांचा इतिहास विद्यार्थ्यांच्या समोर मांडून आजच्या काळात समाजाला शिवछत्रपतींच्या विचारांची,गुणांची गरज आहे हे स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे नियोजन आनंद विद्या निकेतन हायस्कूल व हिंद इंग्लिश मिडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोगे सर यांनी केली. सूत्रसंचालन लक्ष्मण मासाळ यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.