Pune – इंन्स्टाग्रामची ओळख पडली महागात , तब्बल 33 लाखांची फसवणुक

एमपीसी न्यूज – इंन्स्टाग्रामवर ओळख करून तब्बल 33 लाखांची ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणुक केल्याची घटना पुण्यातील टिंगरेनगर येथे राहणा-या इसमासोबत घडली आहे. याप्रकरणी एका 37 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.हि फसवणूक 1 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीत झाली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची इंन्स्टाग्रामवर एका परदेशी अनोळखी इसमाशी ओळख झाली होती. त्यानंतर त्या इसमाने फिर्यादीशी चांगली ओळख झाल्यानंतर भारतात येऊन पैसे इन्व्हेस्ट करण्याची ईच्छा व्यक्त केली. आणि व्हाट्सअॅपद्वारे लंडन ते दिल्लीच्या विमानाच्या तिकीटाचा फोटो पाठवून 10 सप्टेंबरला दिल्ली एअरपोर्टवर येणार असल्याचे सांगितले. त्यांनंतर एका महिलेने फिर्यादी यांना फोन करून आपण दिल्ली येथून कस्टम ऑफिसर असल्याचे सांगितले.आणि एक परदेशी इसम दिल्लीला आला असून त्याने यलो पेपरची प्रोसीजर फॉलो केली नसून त्याच्याजवळ महागड्या वस्तू आणल्या असल्याचे सांगितले. तसेच त्याच्याजवळ असलेली फॉरेन करन्सी फिर्यादी यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यासाठी आणि त्यासोबत इतर परवानग्या मिळविण्यासाठी फिर्यादी यांना 9 वेगवेगळ्या बॅंक खात्यांवर तब्बल 33 लाख 50 हजार 975 इतकी रक्कम भऱण्यास वेळोवेळी फोन करून भाग पाडले आणि फिर्यादीची ऑनलाईन माध्यमाद्वारे फसवणुक केली.

याप्रकरणी एक परदेशी इसम व एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपाल पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.