Post Payment Bank : पोस्ट विभागाच्या पोस्ट पेमेंट बँकेच्या संचालकपदी विनय गानू यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – पुण्यातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकांऊटन्ट (Post Payment Bank) विनय गानू यांची भारतीय पोस्ट विभागाच्या पोस्ट पेमेंट बँकेच्या संचालकपदी नियुक्ती झाली आहे.

विनय गानू हे सहकार क्षेत्रातील अतिशय अनुभवी व्यक्तीमत्व असून, शिखर बॅंकांसहित अनेक सहकारी बॅंक, पतसंस्था यांच्या लेखा परिक्षणाचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. त्याशिवाय महाराष्ट्र शासनाने विविध सहकारी साखर कारखान्यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीत मुख्य चौकशी अधिकारी म्हणूनही त्यांनी आपली चोख भूमिका बजावली आहे. विविध सहकारी वित्तीय संस्थांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांमध्ये त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

Kasarsai : बिबट्याने पळवले कुत्र्याचे पिल्लू; गावात दहशतीचे वातावरण

आता भारत सरकारने त्यांची पोस्ट पेमेंट बॅंकेच्या (Post Payment Bank) संचालकपदी नियुक्ती केली. ही संपूर्ण राज्यासाठी गौरवाची बाब आहे. त्यांचे राज्यातील जनतेच्या वतीने अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.