Charoli News: चऱ्होली परिसरात विकास गंगा आणणाऱ्या नगरसेविका विनया तापकीर (भाग एक)

एमपीसी न्यूज – चऱ्होली परिसर म्हणजे स्मार्ट सिटी असणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहराचे शेवटचे टोक. 1997 साली पिंपरी-चिंचवड महापालिकेत या परिसराचा समावेश झाला. हा परिसर शहरा जवळ असला तरी विकास कामांपासून तसा वंचीतच होता. यावेळी 2012 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सौ. विनया प्रदिप तापकीर यांना नगरसेविका काम करण्याची संधी दिली, अन तेथून चऱ्होली परीसर हळूहळू कात टाकू लागले, कारण महापालिकेत समावेश होऊन देखील चऱ्होली परिसरात विकास कामांचा वनवा होता.

 

विनया तापकीर व त्यांचे पती प्रदिप आबा तापकीर यांनी हे रुप बदलायचा संकल्प केला. त्या सुमारास चऱ्होली परिसरात मोठ-मोठे गृहप्रकल्प होण्यास सुरुवात झाली होती.  चऱ्होलीचा विस्तार होत-होता त्या विस्ताराला साजेसा विकास या परिसरात असण्याची गरज भासत होती (Charoli news). ही तळमळ मनात घेऊन विनया तापकीर यांनी नगरसेविका म्हणून कामाला सुरुवात केली.

सुरुवातील आरक्षण टप्याटप्प्याने विकसीत करणे गरजेचे होते. हे काम आधी विनया तापकीर यांनी हाती घेतले. पिंपरी-चिंचवड महापालिकेची सत्ता त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती होती, ज्याचा पुरेपुर व सर्वात जास्त फायदा विनया तापकीर यांनीच करून घेतला.त्यांच्या याच कालावधीत आळंदी ते पंढरपूर या पालकी मार्गाला गती मिळाली.

याच पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या समुह शिल्पाचे काम सुरु झाले. तत्कालीन उमुख्यमंत्री अजित पवार यांनीत्याचे भूमीपुजन केले तसेच भक्कम निधी सुद्धा उपलब्ध करुन दिला. यातूनच विकास कधी थांबत नसतो ती एक अविरत प्रक्रीया आहे यावर चऱ्होलीकरांचा विश्वास बसला. वाड्या, वस्त्यांवर विकास गंगा पोहचू लागली. अनेक छोट्या मोठ्या गृहप्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात परिसरात वस्तीकरण वाढले त्यामुळे परिसराता चेहरा बदलू लागला.

हा विकास चिरंतन राहणारा आहे, माणसं येतील जातील पण विकास कामे त्या माणसांची आठवण ठेवून जातील एवढं भल मोठं काम विनया तापकीर यांनी केले आहे.

विनया तापकीर यांनी परिसरात आणलेल्या विकास गंगेचा आढावा घ्यायचा असेल तर तो पुढील प्रमाणे असेल (Charoli news)

  1. वाघेश्वर मंदिर घाट, वाघेश्वर मंदिर, माऊली नगर वडमुखवाडी, चोवीसवाडी चऱ्होली फाटा भोसले वस्ती, बुर्डे वस्ती येथे विजेचे पोल उभारले.
  2. साई मंदिर परिसर, वडमुखवाडी, चऱ्होली गावठान भागात सिमेंट रस्ते केले.
  3. मुलांचे शिक्षण आनंददायी व्हावे यासाठी प्रभागातील महापालिकेच्या शाळेत टीव्ही संच उपलब्ध करुन दिले.
  4. सिल्वाना काऊंटी, शामा इस्टेट, नंदादीप, आंनदतरंग, रमामाधव पार्क अशा कितीतरी सोसायट्याचा पाणीपुरवठा सुरळीत केला.
  5. केंद्र सरकार अंतर्गत सुरु असलेल्या आयुष्यमानभारदत योजनेमध्ये प्रभागातील कुटंबांना या योजनेचा लाभ मिळवून दिला.
  6. सोळु मरकळ बायपास, दाभाडे वस्ती, चऱ्होली ते लोहगाव धानोरी ला जाणारा रस्ताचे काम पूर्ण केले.
  7. महापालिकेच्या आरक्षित जागेत पद्मावती हॉस्पीटल उभारणी केली.
  8. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी छिक छिकाणी पाण्याच्या आठ टाक्या उभ्या केल्या.
  9. कृतज्ञता सन्मान सोहळा म्हणून प्राभागातील 40 वर्ष सहजीवनाला झालेल्या एक हजार दाम्पत्यांचा सन्मान केला.
  10. 250 पेक्षा जास्त महिला बचत गट स्थापन करून त्यांना सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविले  आहेत.
  11. बुर्डेवस्ती, सैनिक कॉलनी, खाणीचा रोड (पाण्याची टाकी -20 दशलक्ष लिटर), प्राईड वर्ल्ड सिटी (70 दशलक्ष लिटर), डुडुळगाव दोन पाण्याच्या टाक्या (20 व 30 दशलक्ष लिटर), कोतवालवाडी (15 दशलक्ष लिटर) उभ्या केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.