Vinaya Tapkir : कोरोना काळातही विनया तापकीर यांची चऱ्होलीकरांना खंबीर साथ – भाग दोन

एमपीसी न्यूज – जगात पसरलेल्या कोरोना (Vinaya Tapkir) या महामारीच्या काळातही नगसेविका या नात्याने विनया तापकीर यांनी त्यांच्या प्रभागातील नागरिकांना खंबीर साथ दिली व त्या संकटातूनही नागरिकांना बाहेर काढले. यावेळी विनया तापकीर यांचे पती प्रदिप आबा यांचीही मोलाची साथ विनया तापकीर यांना मिळाली. दोन्ही पती-पत्नीने मिळून या संकटकाळी प्रभागातील नारिकांना मदत केली.
चऱ्होली परिसराच्या आसपास एमआयडीसी क्षेत्र असल्याने तेथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग राहतो. कामगार नगरी म्हणून या परिसराला ओळखले जाते. या कामगारांना कोरोना काळात खायला अन्न मिळणे मुश्कील झाले होते. यावेळी विनया तापकीर व प्रदिप आबा तापकीर यांनी कामगारांना मोफत जेवणाची पाकिटे वाटली, अन्न-धान्य़ वाटले. तसेच, गरजूंना रेमडेसिव्हीर इंजेक्शनची मदत केली. प्रभागात लसीकरणांची ठिकठिकाणी केंद्रे उभारून नागरिकांना लसीकरण करण्यासाठी जागृत केले.
याबरोबरच ‘डॉक्टर आपल्या दारी’ ही योजना राबवून मोफत औषध गोळ्यांचे वाटप देखील केले. कोविड काळात उपचारासाठी होणारे नागरिकांचा हाल पाहून विनया तापकीर व प्रदिप आबा यांनी त्यांच्या अथक प्रयत्नातून प्रभागातील पद्मावती हॉस्पिटल उभे करून त्या ठिकाणीच कोविड सेंटर उभे केले. ज्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय झाली व वेळेत उपचार मिळाल्याने अनेकांचे जीव वाचले.
त्यांच्या या कामाचे प्रभागातील नागरिकांनीही तोंडभरून (Vinaya Tapkir) कौतुक केले. याबरोबरच कोरोनासोबत गेल्या वर्षी शहरात झालेल्या पावसाने प्रभागात जागोजागी पाणी साठले होते. नागरिकांच्या घरात देखील पाणी गेले होते. यावेळी विनया तापकीर यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत नागरिकांना दिलासा दिला व मदत मिळवून दिली. त्यांची प्रभागातील नागरिकांना प्रत्येक संकटकालीन प्रसंगी खंबीर साथ लाभली आहे. कोरोनानंतर पुन्हा त्यांनी विकासकामांसाठी कंबर कसली असून चऱ्होलीतील विकासकामांसाठी दहा वर्षात बाराशे कोटींचा निधी उपलब्ध करून दिली आहे.
याविषयी बोलताना विनया तापकीर म्हणाल्या की, चऱ्होली परिसरात रहिवासी क्षेत्र मोठे आहे. त्यानुसार मोठमोठे गृहप्रकल्प येथे येत होते. त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, हे नगरसेविका म्हणून माझे काम होते. प्रत्येक वाडी वस्तीवर सिमेंट व डांबरीकरण केले आहे. तसेच, सुशोभिकरणासाठी संत नामदेव व संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या भेटीवर आधारित समूह शिल्प उभे केले, संत ज्ञानेश्वर जलतरण तलाव उभा केला. क्रिडा संकुल, जलशुद्धीकरण केंद्र उभे केले. अशी नागरिकांची अनेक कामे मार्गी लावली, अजून खूप कामे करायची आहेत. नागरिकांची यासाठी साथ लाभत आहे, तशीच ती भविष्यात देखील लाभावी हिच इच्छा आहे. कारण जनतेने भरलेल्या कररूपी पैशांतून झालेल्या विकास कामांचे खऱे शिल्पकार माझी जनताच आहे, असे मत विनया तापकीर यांनी व्यक्त केले.
विनया व प्रदिप आबा तापकीर (Vinaya Tapkir) यांचे काम एवढ्यावरच थांबणार नाही, तर भविष्यातील पुढील व्हिजन देखील ते साकारणार आहेत.
1) वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुढील 25 वर्ष पुरेल अशी 24 तास पाणी पुरवठा योजना राबविणे.
2) महापालिकेच्या आरक्षित जागेवर तीन अदयावत उद्याने विकसीत करणार.
3) महापालिकेचे 100 बेडचे रुग्णालय सुरु करणार.
4) रखडलेले सर्व रस्त्यांची कामे मार्गी लावणार.
5) ठिकठिकाणी क्रीडांगण उभे करणार.
6) अद्ययावत मंडई बांधणार.
7) वडमुखवाडी पाण्याची टाकी (15 दशलक्ष लिटरची टाकी उभारणार).